20231226 105414 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024 : Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana Online Apply" width="1280" height="720" />
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana Online Apply : महाराष्ट्र शासनाने लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या इच्छुक असणाऱ्या व पात्र शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान देण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना 20 जून 2018 रोजी राबवण्यास सुरुवात झाली.
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana Online Apply" width="1024" height="576" />
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोळा बहुवार्षिक फळ पिकांची लागवड करता येते. मागच्या वर्षांमध्ये 40,000 हेक्टरी इतके क्षेत्रफळ झाडे लागवडी खाली आणण्याची अपेक्षाही कृषी विभागाच्या मार्फत दर्शवण्यात आलेली होती. तसेच कोविड मुळे सन 2020 – 21 व 2022 वर्षासाठी ही योजना राबवण्यात आलेली नव्हती. परंतु आता चालू असणाऱ्या आर्थिक वर्ष 2023 – 24 वर्षांमध्ये ही योजना राबवण्यास सरकारने मान्यता दर्शवलेली आहे. ( Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana )
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. किंवा जे शेतकरी फळबाग लागवड करण्यासाठी पात्र ठरू शकत नाही. त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप मोठी संधी आहे. ही योजना 100% राज्य पुरस्कार योजना असून याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून महा डीबीटी ( MAHA Direct Benifit Transfer)पोर्टल वर अर्ज करता येतो.
काजू, पेरू, डाळिंब, मोसंबी, लिंबू, नारळ, संत्रा, आवळा, सिताफळ, जांभूळ, चिंच चिकू, अंजीर, फणस, कोकम, आंबा अशा प्रकारच्या फळ लागवडीसाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येते.
ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्याच्या नावाने सातबारा उतारा असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी 20 गुंठे जमीन असणे आवश्यक आहे.
ज्या शेतकऱ्यांची उपजीविका ही शेती वरती अवलंबून असेल अशा शेतकऱ्यांना सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येईल अशी अट देखील निश्चित केलेली आहे. ( Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana )
ज्या शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यायचा आहे. अशा शेतकऱ्यांकडे कमीत कमी 20 गुंठे जमीन असणे आवश्यक आहे. व ही अट कोकण विभागातील रहिवासी असणाऱ्या शेतकऱ्यांना दहा गुंठे ठरविण्यात आलेली आहे. तसेच कोकणामधील रहिवाशी असणाऱ्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी कमाल मर्यादा सहा हेक्टर पर्यंतची निश्चित करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्रामधील इतर शेतकऱ्यांसाठी ही मर्यादा 10 हेक्टर निश्चित केलेली आहे. व उपलब्ध शेतकरी क्षेत्रामध्ये शेतकरी विविध फळांची देखील लागवड करू शकतात. आणि या विषयी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अतिरिक्त माहिती हवी असल्यास ती सर्व माहिती महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध असून तुम्ही तेथे भेट देऊन देखील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची संपूर्ण माहिती सहजरीत्या मिळवू शकता. ( Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana )
ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे. ते शेतकरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम MahaDBT Farmer Login करून त्याअंतर्गत फलोत्पादन घटकात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज करावा लागते. शेतकऱ्यांना 01 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये अर्ज करावा लागतो. आणि जर तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेविषयी कोणतीही अडचण आल्यास तुम्ही महाडीबीटी अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन याविषयी अधिक सर्व माहिती सविस्तर रित्या मिळवू शकतात. ( Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana )